Plantation Day 2020

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून सभोवताली असलेले पर्यावरण प्रेम प्रकट झाले आहे. मित्रांनो पर्यावरण म्हणजेच सभोवताली असलेली नैसर्गिक सृष्टी , आपली जननी, अर्थातच वसुंधरा. नुकत्याच वाचनात आलेल्या, श्री. धीरज नवलखे यांच्या या चारोळी खूपच मनाला भिडल्या…. पूरे जाहले तूझे तापणे जरा उमाळा उमलू दे , नजर घनाला वर्षुन ह्रदयी तृणा तृणाला उमलू दे . खरोखरच पृथ्वीला विनंती करण्याची वेळ आली आहे, मनुष्य प्राणी च आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या अस्तित्वाचा ठसा पुसत चालला आहे. आणि म्हणूनच असे वनसंवर्धन सप्ताह साजरे करावे लागत आहेत. परंतु ,आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, आद. श्री. धनराज विसपूते व सचिव आद. श्रीम. संगिता विसपूते अनेक वर्षांपासून १जुलै रोजी आपल्या कन्येच्या जन्मदिना निमित्ताने आपल्या शैक्षणिक समूहातील सर्व विभागांद्वारे वृक्षारोपणाचे कार्य न चुकता करत आहेत. आजही या टाळेबंदी च्या काळातही शासन नियमांचे पालन करून या समूहातील सर्वच विभागांतर्फे, कुमारी धनश्री हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.